Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ramadan 2021 : कोरोना कालावधीत सुरू होत आहे पाक रमजानचा महिना

Ramadan 2021 : कोरोना कालावधीत सुरू होत आहे पाक रमजानचा महिना
, बुधवार, 14 एप्रिल 2021 (12:49 IST)
14 एप्रिलपासून पाक रमजान महिन्याचा प्रारंभ झाला. कोरोनाच्या संकट काळात रमजानची बाजारात चहल-पहल ‍दिसणार नाही. इस्लामिक कॅलेंडर प्रमाणे नववा महिना रमजानचा असतो. या पवित्र महिन्यात मुसलमान लोक रोजा ठेवतात आणि चंद्र  बघून ईद-उल-फित्र सण साजरा करतात.
 
पवित्र दया आणि आशीर्वादांनी भरलेला रमजान महिना अल्लावर प्रेम आणि लगन जाहीर करण्यासह स्वत:ला खुदाच्या मार्गावर चालण्याची संधी देणार हा महिना खरोखर प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे. या महिन्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. या महिन्यात इस्लाम धर्माचे लोक उपास करुन आणि वाईट कामांपासून दूर राहून चांगले कार्य करतात आणि रोज ठेवतात.
 
कोरोना संकटाच्या या काळात मुस्लिम समुदाय विशेष खबरदारी घेत रमजान मास चा आरंग करतील. रमजान (रोजा) च्या महिन्यात आपआपल्या घरात नमाज वाचून पूर्णपणे लॉकडाउनचा पालन करण्याचा प्रयत्न करतील. या काळात कोरोना सारख्या जागतिक साथीच्या आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी अल्लाहकडे दुआ मागतील.
 
रमजान हा इस्लाम धर्मानुसार रहमत बरकत व मगफीरातचा महिना आहे. या दिवसामध्ये उपास करुन चांगले काम करण्यास भर दिला जातो. अल्लाहला असे बंदे पसंत पडत नाही जे रोज ठेवतात परंतू वाईट काम सोडत नाही. अल्लाह रमजानमध्ये प्रत्येकाला संधी देतात की त्यांनी वाईट प्रवृत्ती सोडावी आणि चांगला जीवन जगण्यासाठी प्रयत्न करावे. रमजानमध्ये प्रत्येक नेक आणि वाईट कामाचं सत्तरपटीने फल प्राप्त होतं. अशात चांगले कार्य केल्यास सत्तर पटीने आपल्या पदरी चांगुलपणा येईल. रमजान महिन्यातील उपास तीस दिवसापर्यंत असतात. या महिन्यात घरीच नमाज वाचून लॉकडाउनचे पालन करणे फायद्याचे ठरेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चैत्रगौरी सोहळा