Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कृषि विकास व शेतक-यांची यशोगाथा मांडणारा महोत्सव

Webdunia
मंगळवार, 18 ऑक्टोबर 2016 (11:24 IST)
राज्यातील शेतक-यांची यशोगाथा, कृषि विकास, जलसंधारण या विषयावर  'महाराष्ट्र माझा, शेतकरी राजा' लघुपट स्पर्धा (2016) स्पर्धेचे आयोजन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग लोकांसमोर यावेत ह्या हेतूने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धकांनी गेल्या दोन वर्षातील कृषि क्षेत्राचा विकास, शेतकरी बांधवांची बदललेली परिस्थिती, जलयुक्त शिवार योजना, पीक कर्जाची सहज उपलब्धता, जलसंधारणामुळे शेतीचा विकास, शासकीय योजनांच्या सहकार्याने शेतीत केलेले प्रयोग अशी यशोगाथा सांगणारे लघुपट तयार करावेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे मनोगत घ्यावे, यशोगाथा चित्रिकरण करीत असताना संबंधित शेतकऱ्याचे ना हरकत प्रमाणपत्र स्पर्धकांनी घेणे बंधनकारक राहील. लघुपट स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. लघुपट हा तीन ते पाच मिनिटे कालवधीचा असावा. चित्रीकरण उत्कृष्ट दर्जेचे  (HD) असणे आवश्यक आहे.

लघुपटाचे चित्रिकरण हे सद्दस्थितीतील असावे. ते संकलीत करून यशोगाथा स्वरूपात स्पर्धकांनी सादर करणे आवश्यक आहे. जुने चित्रिकरण असलेले लघुपट स्पर्धेसाठी पात्र ठरणार नाही. स्पर्धकांनी चित्रिकरण कुठे आणि कधी केले याबाबतचे प्रमाणपत्र देखील देणे आवश्यक आहे. परिक्षकांच्या समितीने निवडलेल्या लघुपटास पारितोषिक देण्यात येईल. प्रथम क्रमांक विजेत्या लघुपटास 51 हजार रुपयांचे तर द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे 31 हजार आणि 21 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे सर्व हक्क माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे राखून ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी हे लघुचित्रपट दि. 10 नोव्हेंबर 2016 पर्यंत dgiprnwes01@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत. स्पर्धक लघुपटाच्या डीव्हीडीज आपल्या जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयाकडे देऊ शकतात. अशी माहिती महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी सांगितली  
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

हैदराबादमध्ये मनमोहन सिंग यांची प्रतिमा बसवणार, रेवंत रेड्डींची माजी पंतप्रधानांना 'भारतरत्न' देण्याची मागणी

नववर्षापूर्वी पुण्यात मोठी कारवाई, एक कोटी रुपयांची दारू जप्त, नऊ जणांना अटक

LIVE: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नितीश राणेंवर जोरदार टीका केली

केरळला मिनी पाकिस्तान म्हणाले नितीश राणेंना द्वेष मंत्रालयाचे मंत्री करा, संतापले अबू आझमी

दिल्ली आणि काश्मीरला जोडणाऱ्या 5 नवीन आधुनिक रेल्वे सुरू होणार

पुढील लेख
Show comments