Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिंटू शेख प्रकरणी नितेश राणे हायकोर्टात

Webdunia
गुरूवार, 17 एप्रिल 2014 (12:12 IST)
'स्वाभिमान' संघटनेचा माजी सदस्य चिंटू शेख  याच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने  (सीबीआय) नोंदविलेला खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा रद्द  करण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पुत्र  आणि संघटनेचे अध्यक्ष नितेश यांनी हायकोर्टात धाव घेतली  आहे. त्यावर दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश  कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.

चिंटू शेख आणि माझ्यात कोर्टाबाहेर तडजोड झाली असून तो   आपल्याविरुद्धचा गुन्हा मागे घेण्यासाठी तयार आहे. या  पार्श्वभूमीवर सीबीआयने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा रद्द करावा,  अशी मागणी नितेश यांनी एका याचिकेद्वारे हायकोर्टात केली  आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा  प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर नितेश यांच्या याचिकेवर  सुनावणी झाली. त्या वेळी नितेश यांच्या वतीने अ‍ॅड्.  महेश जेठमलानी यांनी शेख गुन्हा मागे घेण्यास तयार  असल्याचे न्यायालयाला सांगितले. अशा गंभीर स्वरुपाच्या  गुन्ह्यांमध्येही दोन्ही पक्षांमध्ये तडजोड शक्य असल्याचा  निकाल सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिल्याचे जेठमलानी  यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच या  प्रकरणी निव्वळ राजकीय वादातून नितेश यांच्याविरुद्ध गुन्हा  दाखल करण्यात आल्याचा दावा करीत सुप्रीम कोर्टाच्या  निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल  केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी जेठमलानी यांनी केली.

मुंबईत पक्ष्यांच्या कळपावर विमानाची धडक लागून 40 फ्लेमिंगोचा मृत्यू

परळी मध्ये उष्माघाताने भाजीविक्रेताचा मृत्यू

SRH vs KKR : कोलकाता आणि हैदराबाद अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या इराद्याने समोर येणार

सोलापुरात घरगुती वादाला कंटाळून महिलेने तलावात उडी घेतली, लोकांनी वाचवले तिचे प्राण

धोनी लंडनला जाऊन उपचार घेणार, नंतर निवृत्तीचा विचार करणार!

छपरामध्ये मतदानानंतर तरुणाची हत्या, 2 जणांना अटक

सोशल मीडिया बनला जीवघेणा शत्रू , ट्रोलिंगने घेतला आईचा जीव

भगवान जगन्नाथांशी जोडलेल्या टीकेवर संबित पात्राने मागितली माफी, म्हणाले-प्रायश्चित्तासाठी ठेवेल 3 दिवस उपास

नोएडा मध्ये शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कारने दिली धडक, एका विद्यार्थ्यांचा मृत्यू

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

Show comments