Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चोरांची सुट्टी दुसऱ्याच्या घरात साजरी

Webdunia
बुधवार, 2 नोव्हेंबर 2016 (17:38 IST)
ऐत्या घरात घरोबा अशी मराठीत म्हण आहे आणि ती सिद्ध केली आहे काही  चोरांनी. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त परगावी गेलेल्या डॉक्टर च्या बंगल्यात दोन चोरांनी दिवाळी साजरी केली.घरात घुसलेल्या या चोरांनी घरातच मुक्काम ठोकत दोन दिवस वास्तव्य केलहोते.   
 
वसईमधल्या माणिकपूर येथील  डॉक्टर  प्रशांत  पाध्ये दिवाळीत बाहेरगावी गेल्यानं त्यांचा पारिजात बंगला रिकामा होता. ती संधी साधून दोन चोर घरात घुसले होते.
 
घरात चहा, पोहे बनवून हे चोर खात होते. पाध्येंचा बंगला आपलाच असल्याच्या तोऱ्यात या चोरांनी बंगल्यात मुक्काम  होता. बंगल्यात राहताना त्यांनी डॉक्टर पाध्येंच्या खाजगी डायरीमधून त्यांच्या बँकेचे अकाउंट नंबर आणि पासवर्डही चोरले होते.
 
मात्र शेजाऱ्यांना बंगल्यातल्या हालचालीचा संशय आला आणि त्यांनी पोलिसांना बोलवून घेतलं. या चोरांनी 22 हजारांचा मुद्देमाल चोरल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पोलिसांनी आरोपी राजकुमार निशादला अटक केलीय. तर दुसरा सहकारी पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास करत आहे.

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पीएम नरेंद्र मोदींनी सांगितले, का दुखावले गेले अखिलेश यादव

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

जर बहुमत मिळाले नाही तर काय होईल BJP चा प्लॅन-बी? अमित शहांनी सोडले मौन, केजरीवालांवर साधला निशाणा

शरद पवार यांनी पीएम नरेंद्र मोदी यांच्यावर टाकला कटाक्ष, म्हणले-'जेव्हा सीएम होते तेव्हा विकास मध्ये रुची होती आणि आता तर बस....'

मधुमेह, हृदय, लिव्हर यासह अनेक आजारांसाठी 41 औषधे स्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments