Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नैसर्गिक वैभव टिकवण्यासाठी 'इको टूरिझम'

Webdunia
MHNEWS
पर्यटकांना निसर्गाचे महत्व कळावे आणि पर्यटनाबरोबचर नैसर्गिक सौदर्य अबाधीत रहावे यासाठी शासनाकडून इको टूरिझमची नवी संकल्पना राबविण्यात येत असून याची सुरूवात विदर्भातून होत आहे.

समुद्रकिनारे, पर्वतरांगा आणि घनदाट जंगले अशा निसर्गसंपदेचे वैभव महाराष्ट्राला लाभले आहे. अलीकडच्या काळात येथील पर्यटनक्षेत्राचा झपाट्याने विकास होत आहे. मात्र, हा विकास होत असतानाच कोठेतरी निसर्गांची हानी होत आहे. याला आळा बसावा यासाठी चांगल्या सुविधा देण्याबरोबरच पर्यटकांमध्ये जागृती करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने इको टूरिझमसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

निसर्गसौंदर्याने नटलेल्या विदर्भातून याची सुरूवात होते आहे. ताडोबा, रामटेक, नवेगाव बांध यांसारखी पर्यटन प्रेमींची आवडती ठिकाणे येथे आहेत. याठिकाणी जंगल सफारी, पर्यावरण पर्यटन, ट्रेकिंग, निसर्ग भ्रमण यांना खूप संधी आहे. याठिकाणी इको टूरिझमच्या माध्यमातून पर्यटनविकास करण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे. सुरूवातीस विदर्भातील सात जिल्ह्यात सर्किट पद्धतीने विकास करण्याचा आराखडा करण्यात आला आहे. यामध्ये पेंच, रामटेक, खिंडसी, नगरधन, नवेगांवबांध, इटिया डोह, अंभोरा, बोधलकासा, नागझिरा, ताडोबा, भामरागड, चिखदरा, मेळघाट, नरनाळा येथील पर्यटन स्थळांचा समावेश आहे.

या योजनेनुसार जंगल सफारी, ट्रेकिंग, निसर्ग भटकंती, प्राणी व पक्षी पाहण्यासाठी प्रशिक्षकस मार्गदर्शक व सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. पर्यटकांना जंगलात थांबण्यासाठी पर्यटन महामंडळातर्फे तंबू (टेंट) पुरविण्यात येणार आहेत. पेंच व इटियाडोह खिंडसी, बोधलकसा व चोखामार येथे जलक्रीडा, साहसी क्रीडा, विंडसर्फिंग आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय पर्यटकांना निसर्गांचे महत्व पटवून देऊन ‍हानी गैरप्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

Show comments