Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईतील हिंसेस मुख्यमंत्री जबाबदार- मुंडे

गोपीनाथ मुंडे यांचा आरोप

महेश जोशी
सोमवार, 18 फेब्रुवारी 2008 (19:27 IST)
मुंबईतील हिंसाचाराला विलासराव देशमुख आणि आर. आर. पाटील हेच जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.
परप्रांतीयांच्या मुद्यांवरून मुंबईत हिंसाचार उसळला असताना मुख्यमंत्री आणि गृहखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री शहराबाहेर होते.उभा महाराष्ट्र पेटला होता. मात्र दोन्ही नेत्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. त्याच दिवशी राज ठाकरे आणि अबू आझमी यांना अटक केली असती तर, मोठा अनर्थ टळला असता.असेही ते म्हणाले.

बीड येथे एका बँकेच्या उद्घाटनानंतर मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुंबईतील हिंसाचारापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपर्यंत अनेक मुद्यांवर मुंडे यांनी आघाडी सरकारला कैचीत धरले. मुंबईतील परिस्थिती हाताळण्यास राज्य शासन अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव मार्ग असल्याचे मुंडे यांनी सांगितले. पॅकेज देऊन शेतकर्‍यांचे भले होणार नाही. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी विदर्भात शेतकर्‍यांसाठी पॅकेज दिले मात्र या पॅकेजमुळे बँकांना मोठा फायदा झाला. शेतकरी मात्र आहे त्याच परिस्थितीत आहेत. त्यामुळे संपूर्ण कर्जमाफी करून सरकारने शेतकर्‍यांच्या समस्या सोडवाव्यात. कर्जमाफीचा निर्णय घेताना त्यात कोणताही भेदभाव नको असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

गेल्या महिन्यात आपल्याला आणि आपले बंधू पंडितअण्णा मुंडे यांना निनावी पत्र आणि मोबाईलवर जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.
सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

जयपूर अपघातात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, 30 जणांची प्रकृती गंभीर

LIVE: बीड हत्याकांड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केले

'मुंबई आधी महाराष्ट्राची, मग भारताची' म्हणाले आदित्य ठाकरे

नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांड: वैमनस्यातून 5 आरोपींनी मिळून पिता-पुत्राची हत्या केली

गडचिरोली मध्ये दोन नक्षलवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफसमोर शस्त्र ठेऊन आत्मसमर्पण केले

Show comments