जळगाव जिल्ह्यातील फैजपूर रस्त्यावरएक डंपर आणि क्रूझर जीपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या लोकांचा या अपघातात बळी गेला आहे ते एका लग्न समारंभाहून घरी परतत असताना रविवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
सुत्रांच्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील यावल-फैजपूर रस्त्यावरील हिंगोणे गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले लोक हे चौधरी आणि महाजन कुटुंबातील आहेत. ते एकमेकांचे नातेवाईक असून चोपडा येथून एक लग्न समारंभ आटोपून क्रूझर जीपमधून घरी येत असताना ही दुर्घटना घडली. यात क्रूझरचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.