Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत भीषण अपघात10 महिला होरपळल्या

Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 (16:29 IST)
अनंत चतुर्दशीला सर्वत्र 10 दिवसांच्या गणपतींचे विसर्जन झाले. नागपुरात गणपती विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. नागपुरात गणपती विसर्जनादरम्यान मोठा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. 
 
नागपुरातील उमरेड परिसरात गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमाच्या वेळी ढोल ताशांच्या गजरांसह गणरायाची मिरवणूक निघाली. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे अनेकांच्या अंगावर अचानक ठिणग्या पडल्या. या अपघातानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घाईघाईने पळून गेल्याने अनेक जण जखमीही झाले. गणपती विसर्जनाच्या वेळी फटाक्यांमुळे आठ ते दहा महिला होरपळल्या सांगण्यात येत आहे.तर अनेक जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे.व्हिडीओ मध्ये लोक विर्सजन मिरवणुकीत सम्मिलीत झाले आहे ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघत आहे. अचानक मिरवणुकीत फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली. फटाक्यांची ठिणगी गर्दीत असलेल्या लोकांवर पडली आणि काही महिला होरपळल्या महिलांमध्ये गोंधळ उडाला आणि लोक पळू लागले. चेंगराचेंगरीची स्थिती झाली अनेक महिला जखमी झाल्या. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी केली, व्हिडीओ व्हायरल

Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

पुढील लेख
Show comments