Festival Posters

अकरावीसाठी आता फक्त 15 गुण ग्रेस

Webdunia
पुणे- राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. एखादा विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला यापूर्वी 30 गुण ग्रेस दिले जात होते. त्याला आता केवळ 15 गुण ग्रेस मिळतील. यामुळे अकरावीत नापासाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
 
अकरावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केल्याने हा बदल करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे अकरावीसाठी हा नियम लागू राहील. तो केवळ तीन विषयांसाठी मर्यादित असेल. एकाच विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्याला कमाल दहाच गुण ग्रेस म्हणून दिले जातील. अकरावी आणि बारावी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या निकषातील तफावत यामुळे दूर होणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.
 
अकरावीत तीन विषयांत व दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण विभागून दिले जात होते. म्हणजे त्याला तीन विषयांत प्रत्येकी दहा गुण मिळत होते. आता तेवढे गुण मिळणार नाहीत.
 
विद्यार्थी तीन व दोन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला बारावीप्रमाणे 15 गुण विभागून दिले जातील. निकषात बदल करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य शासनाकडे पाठविला होता.
सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

T20 World Cup 2026: भारताने इंग्लंडला हरवून फायनलमध्ये धडक मारली!

महाराष्ट्रातील वाहतूकदारांचा संप स्थगित, परिवहन मंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर निर्णय मागे

LIVE: एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक': ज्योती वाघमारे आणि रोहित टिळक यांनी राज्यसभेचे उमेदवार जाहीर केले

Sachin Tendulkar son wedding अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी कायद्याला मंजुरी दिली; नितेश राणे म्हणाले की सक्तीने धर्मांतर केल्यास तुरुंगवास होईल

पुढील लेख
Show comments