Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्ध्यात इंस्टाग्राम पोस्टवरून 17 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Webdunia
सोमवार, 10 फेब्रुवारी 2025 (19:06 IST)
आजकाल लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिल्स बनवतात आणि शेअर करतात. लाईक्स मिळवण्यासाठी जीवाशी धोका देखील पत्करतात. 
ALSO READ: मुंबई : प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची निर्घृण हत्या
या रिल्समुळे कधी कधी त्यांना आपला जीव गमवावा लागतो. अशीच घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. वर्ध्यात इंस्टाग्रामच्या एका पोस्टवरून झालेल्या वादातून एका तरुणाने 17 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून केला. 
सदर घटना शनिवारी हिंगणघाटच्या पिंपळ गावात घडली. एक महिन्यांपूर्वी मयत मुलाने आणि आरोपीने  सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली होती. 
ALSO READ: तलावात बुडून चार मुले आणि एका महिलेचा मृत्यू, सर्व शेळ्या चारायला गेले होते
या स्टोरीवर दोघांनी यूजर्सला मतदान करण्यास सांगितले. या स्टोरीवर पीडित मुलाला आरोपीपेक्षा जास्त मते मिळाली होती. त्याचा राग आरोपीला आला आणि दोघांमध्ये वादावादी झाली. या वर आरोपीने त्याच्या मित्रासह अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केला आणि त्याची निर्घृण हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: पालघरमध्ये अडीच कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त, आरोपीला अटक

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

Nagpur Violence औरंगजेब वाद, जाळपोळ आणि तोडफोडीवरून नागपुरात हिंसाचार उसळला... अनेक पोलिस जखमी

नागपुरात औरंगजेबाच्या कबरेच्या वादावरून दोन गटांमध्ये संघर्ष, वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधारांच्या नळकांड्या फोडल्या

नागपुरात विहिंप आणि बजरंग दलाचे निदर्शने,औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र

LIVE: औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आधार कार्ड वापरून 20.25 कोटी रुपयांची फसवणूक,मुंबईतील महिला डिजिटल अटकेची बळी

पुढील लेख
Show comments