महाराष्ट्र राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने महत्वपूर्ण असलेल्या 18 नगरपंचायतींचे अध्यक्षपद आणि 233 नगर परिषदांच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात काढण्यात आली.
अध्यक्ष पदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 18 नगरपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी 2, अनुसूचित जमातीसाठी 5, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 6 तर खुला प्रवर्गासाठी 5 पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी सोडत काढण्यात आलेल्या 233 नगरपरिषदांपैकी अनुसूचित जातीसाठी 31, अनुसूचित जमातीसाठी 10, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 63 तर खुला प्रवर्गासाठी 129 पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आले.