Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 23 March 2025
webdunia

२३ वर्षीय गुन्हेगाराला ६ बायका, २५ मुलं-मुली, ४४ गुन्हे; फरार आरोपी जेरबंद

arrest
, गुरूवार, 7 एप्रिल 2022 (09:51 IST)
अहमदनगर- राज्यात अनेक ठिकाणी विविध गुन्ह्यांत वांटेड आरोपी संदीप ईश्‍वर्‍या भोसले याला नगरच्या पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यात जेरबंद केले. बेलगाव ता. कर्जत रहिवासी २३ वर्षीय या आरोपीवर तब्बल ४४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच ३ वेळा मोक्काअतंर्गत कारवाई केलेला हा आरोपी फरारी होता. 
 
२३ वर्षीय संदीप भोसले याला सहा बायका असून 25 मुलं-मुली असा त्याचा संसार आहे. संदीप भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अहमदनगर, पुणे, सातारा, बीड व औरंगाबाद येथे दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदेशीररित्या हत्यार अशा प्रकारचे एकूण गुन्हे दाखल आहेत. तसंच अहमदनगरला एक, बीडला एक व पुणे एक असे तीन जिल्ह्यात तीन मोक्काअंतर्गत गुन्हे आहेत. 
 
२६ गुन्ह्यात तो फरारी होता. यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने शोध सुरू करुन आरोपींला अटक करुन तपास सुरु केला आहे.  संदीप ईश्‍वऱ्या भोसले याला सहा बायका असून सुमारे पंचवीस मुलं-मुली असा त्याचा संसार आहे. अनेक वर्षांपासून तो फरार होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुस्ती क्षेत्राला आलेली मरगळ दूर होईल : हिंदकेसरी पै. संतोषआबा वेताळ