Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

बीडमध्ये पोलीस भरतीच्या तयारीत असलेल्या 3 तरुणांना एसटी बसने चिरडले

road accident in Beed
, रविवार, 19 जानेवारी 2025 (15:29 IST)
बीड येथे आज सकाळी भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. हे तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते. या अपघातामुळे पुन्हा एकदा बीड चर्चेत आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघे तरुण पोलिस भरतीची तयारी करत होते असून त्यांची धावपळ सुरु होती. दरम्यान एसटी बसने तिघांना धड़क देऊन चिरडले. त्यात तिघांचा जागीच मृत्यु  झाला. 
हा अपघात बीडच्या घोरका राजुरी जवळ झाला असून या अपघातात दोघे जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
या दोघांनी वाचण्यासाठी बस समोर उडी घेतली आणि ते वाचले मात्र इतर तिघांचा मृत्यु झाला. 
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून मृतदेह शव विच्छेदनासाठी   पाठविण्यात आले आहे. मृतांची ओळख पटली आहे. सुबोध बाबासाहेब मोरे, विराट घोड़के, ओम सुग्रीव घोड़के अशी मयत तरुणांची नावे आहे.  

पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी राज्य परिवहन बसची तोड़फोड़ करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना राज्य परिवहन विभागात नौकरी देण्याची मागणी केली जात आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकरच्या आजी आणि मामाचे रस्ता अपघातात निधन