Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक: ATM मधून निघू लागले पाट पट पैसे, लोकांनी केली गर्दी

nasik news
एटीममध्ये पैसे नाही किंवा काही बिघाड झाल्यामुळे रसीद मिळाले पण पैसे नाही असे प्रकार खूप अनुभवात आले असतील परंतू नाशिकमध्ये कोणालाही हवासा वाटणारा प्रकार घडला. नाशिकमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ठराविक रक्कम टाकल्यावर त्याच्या पाच पट रक्कम निघत होती.
 
नाशिकच्या सिडको विजयनगर परिसरात अॅक्सिस बँकेचं एटीएममध्ये हा प्रकार घडत होता. सोमवारी रात्री एकाने 1000 रुपये रक्कम टाकल्यास पाच हजार बाहेर पडले तर ही बातमी पसरली आणि लोकांची गर्दी जमू लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गर्दी हटवून ते केंद्र बंद केलं. तो पर्यंत ग्राहकांनी 2 लाख 62 हजार रुपये काढल्याची माहिती मिळाली आहे.
 
दरम्यान, ज्या लोकांना ATM मधून अधिकचे पैसे मिळाले, त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील, असं बँकेनं स्पष्ट केलंय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपला धक्का, स्वबळावर निवडणुका लढणार शिवसेना, पक्ष ठरवणार करणार पीएम उमेदवार