Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आधारकार्ड मिळत नाही, कारण हाताला बोटे आहेत सहा

Nashik news
नाशिकमध्ये असलेला  गुरुदयाल त्रिखा या तरुणाला हाताला सहा बोटे असल्यामुळे  हवालदील झाला आहे.  कारण अनेक खेटे मारुनही त्याला आधार कार्ड मिळत नाही. गुरुदयाल त्रिखा असं  तरुणांचं नाव आहे.

गुरुच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जोडबोट आहे. मात्र आधार कार्ड काढताना केवळ पाच बोटांचेच ठसे घेतले जातात. सहावे बोट असल्यानं तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगत गुरुदयालला आधारकार्ड नाकारलं जात आहे.

काही लोकांनी त्याला अंपगाच्या कोट्यातून आधारकार्ड काढण्याचा सल्ला दिला. मात्र, तो अंपग नसल्यानं या तरुणाला अपंगत्वाचंही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे या तरुणाची अडचण झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अद्भुत नजारा ...... समुद्र किनारी आल्या निळ्या लाटा