Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परभणी हिंसाचार प्रकरणात 51 जणांना अटक, उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने घटनेला दुर्देवी म्हटले

Webdunia
शुक्रवार, 13 डिसेंबर 2024 (18:15 IST)
परभणीत राज्यघटनेच्या अवमानाप्रती हिंसाचार उसळला. या प्रकरणी 51 जणांना अटक करण्यात आली आहे. सदर माहिती पोलिसांनी दिली आहे.10 डिसेंबर रोजी परभणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याची काही घटकांनी अवमानना केली या मुळे लोकांनी संतप्त होऊन तोडफोड आणि जाळपोळ आणि दगडफेक केली. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या गटाच्या नेत्याने याला दुर्देवी म्हटले आहे. 

शिवसेना युबीटीचे खासदार संजय जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, परभणीत हिंसाचार झाला तेव्हा भगवा पक्षाचे नेते कुठे होते. त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले "परभणीची घटना दुर्दैवी आहे. या घटनेतील गुन्हेगार शोधणे हाही तपासाचा भाग आहे. त्यावेळी रस्त्यावर अनेक लोक होते. संविधानाची प्रत कोणी कशी खराब करू शकते?" शिवसेना (यूबीटी) नेत्या पुढे म्हणाले की, आंदोलनात ज्यांचे नुकसान झाले त्यांना प्रशासनाने मदत करावी. 
 
शिवसेना (यूबीटी) नेते संजय जाधव म्हणाले, "परभणीत हिंसाचार उसळला तेव्हा भाजपचे नेते कुठे होते? नुसती भाषणे करून राजकीय फायदा घेणे सोपे आहे, पण त्याचे परिणाम हाताळणे कठीण आहे. वाहनांचे नुकसान होत असताना, हे नेते कुठे होते?"
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: बीएमसी निवडणुकीत उद्धव यांना दणका देण्याच्या तयारीत शिंदे

'कायद्यासमोर सगळे समान', अल्लू अर्जुनच्या अटकेवर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची प्रतिक्रिया

बीएमसी निवडणुकीत उद्धव यांना दणका देण्याच्या तयारीत शिंदे

महिलांसाठी अरविंद केजरीवाल यांच्या दोन मोठ्या घोषणा

देशात बॉम्बच्या धमक्या वाढत आहेत, आतापर्यंत शाळा, विमानतळ आणि आरबीआयला टार्गेट केले

पुढील लेख
Show comments