Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्य प्रदेशातील भिंडमध्ये भीषण अपघात, बस-कंटेनर ट्रकच्या धडकेत 7 ठार आणि 13 जखमी

Webdunia
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (11:04 IST)
मध्य प्रदेशातील भिंडमध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. भिंडमध्ये (विरखडी गावाजवळ), बस आणि कंटेनर ट्रकच्या धडकेत सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर या अपघातात 13 जण जखमी झाले. सध्या मृतांमध्ये किती पुरुष आणि किती महिलांचा समावेश होता याची माहिती उपलब्ध नाही.बस ग्वाल्हेरहून बरेली जात होती. राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी बस डंपरला धडकल्याने शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. गोहाड चौराहा पोलीस स्टेशन परिसरातील कुत्रा बिरखाडीजवळ हा अपघात झाला.
 
अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी पोहचून पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. सध्या मृताची ओळख पटलेली नाही.
 
भिंडचे एस पी मनोज सिंह यांनी सांगितले की,या अपघातातील 13 जखमींपैकी चौघांची प्रकृती गम्भीर आहे.त्यांना ग्वाल्हेरला रेफर करण्यात आले आहे.घटनेची चौकशी केली जात आहे.
 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments