Dharma Sangrah

लवकरच 70 हजार पदांची भरती होणार

Webdunia
शनिवार, 1 डिसेंबर 2018 (09:12 IST)
मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने आता सरकारी नोकरभरतीवरील बंदी उठविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यामुळे राज्यात लवकरच 70 हजार पदांची भरती केली जाणार आहे.
 
राज्य सरकारने नोकरभरतीला दिलेली स्थगिती उठवून 70 हजार पदे भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मराठा आरक्षणाआधी ही भरती झाली तर मराठा समाजाला या भरतीत आरक्षण मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत मराठा आरक्षण लागू होत नाही, तोपर्यंत नोकरभरती करू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीचा निर्णय मागे घेत मराठा आरक्षण लागू येईपर्यंत नोकरभरती करणार नसल्याचे जाहीर केले होते.
 
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाले, आता 70 हजार रिक्‍त पदे केव्हा भरणार, असा प्रश्‍न विचारला. या प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याने शासकीय नोकरभरती सुरू करण्याची घोषणा केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

दीक्षित जीवनशैली: सानंदच्या सोबतीने डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे व्याख्यान

घरात झोपलेल्या तरुणावर बिबट्याचा अचानक हल्ला; मग तरुणाने असे काही केले की....

२०२६ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांचा विक्रम, केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित या १४ महत्त्वाच्या गोष्टी

पाकिस्तानमध्ये लग्न समारंभात आत्मघातकी हल्ला, ७ जणांचा मृत्यू

बीएमसी महापौरपदाची निवडणूक लांबणीवर, शिवसेना-भाजप गटांना नोंदणीचा ​​फटका

पुढील लेख
Show comments