Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब !गुजरातमध्ये 9 हजार कोटीची हेरोईन जप्त

Webdunia
सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (11:20 IST)
कच्छच्या मुंद्रा बंदरावर डीआरआय ने तब्बल 9 हजार कोटी रुपयांची हेरोईन जप्त केली आहे. या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आले आहे.कच्छच्या मुंद्रा बंदरावर डीआरआय ने झडती घेतल्यावर त्यांना हेरोईन सापडली.या प्रकरणात काही अफगाणी नागरिक असल्याची शक्यता वर्तवली जात असून त्यांचा शोध घेत आहेत.

आंध्र प्रदेशातील विजयवाड्यात एका खासगी कंपनीत अफगाणिस्तानमधून काही इम्पोर्ट केल्याची माहिती DRI ला लागली आणि त्यात काही संशयास्पद आणि गैर असल्याची  माहितीच्या आधारे DRI च्या अधिकाऱ्यांनी मुंद्रा बंदरावर आलेल्या दोन कंटेनरची झडती घेतली.त्यात अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचे काही पावडर सारखे पदार्थ आढळले.घटनास्थळी फॉरेन्सिक तज्ज्ञ देखील होते.त्यांनी त्या पांढऱ्या पावडरची चाचणी केल्यावर ती हेरोईन असल्याचे समजले.दोन्ही कंटेनर मिळून तब्बल 2 हजार 988.22 किलोग्रॅम हेरोईन असल्याचे आढळले.या हेरोईन ची किंमत सुमारे 9 हजार कोटी आहे.या छाप्या नंतर दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद,गांधीधाम,मांडवी या ठिकाणी देखील छापे टाकले जात आहे.हे कंटेनर अफगाणांतून आले आहे.काही अफगाणी नागरिकांचा शोध पोलीस लावत आहे.DRI अधिकाऱ्यांच्या मते,हीआतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी आहे.या पूर्वी दोन महिन्यापूर्वी देखील नवी मुंबईतील शेवा बंदरावर देखील 300 किग्रॅ हेरोईन जप्त केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

वादळी पावसामुळे चेन्नईत पूरसदृश परिस्थिती, फेंगल चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्याकडे सरकले

पुढील लेख
Show comments