Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उमेदवार पाहिजेच असेल आणि त्याला जर आम्ही प्रेमाने सांगितलं त्यात काय चुकीचं आहे?-शरद पवार

Webdunia
सोमवार, 15 एप्रिल 2024 (21:31 IST)
शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी उमेदवारी मागे घेऊ नये, यासाठी काही लोकांनी रात्री-रात्री फोन केले, असा आरोप नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. या आरोपाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. "आम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेमाने सांगितलं तर त्यात काय चुकीचं आहे?" असा मिश्किल सवाल पवार यांनी विचारला. पवारांच्या या वक्तव्यानंतर पत्रकार परिषदेत चांगलाच हशा पिकला.
 
विजय शिवतारेंना काही लोकांनी फोन केले, या अजित पवारांच्या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे? असा प्रश्न पत्रकारांकडून शरद पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, "ठीक आहे, आम्हाला एखादा उमेदवार पाहिजेच असेल आणि त्याला जर आम्ही प्रेमाने सांगितलं तर त्यात काही चुकीचं आहे का?" अशा शब्दांत शरद पवारांनी आपली भूमिका मांडली.
 
अजित पवारांचा नेमका आरोप काय?
शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, "लोकसभेची उमेदवारी मागे घेऊ नये म्हणून विजय शिवतारे यांना आलेले फोन त्यांनी मला दाखवले. ते फोन नंबर बघून मला इतकं वाईट वाटलं की कोणत्या पातळीवर राजकारण सुरू आहे. त्यांनी ते फोन नंबर मला दाखवले, एकनाथ शिंदेंना दाखवले  आणि देवेंद्र फडणवीसांनाही दाखवले. मी ज्यांच्यासाठी जीवाचं रान केलं, बाकी काही बघितलं नाही, त्यांच्याकडून माझ्या बाबतीत असं राजकारण सुरू आहे," असा आरोप अजित पवारांनी केला होता.

Edited By - Ratnadeep Ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गृहस्थ जीवनासाठी महादेवाचे 15 संदेश

श्री तुळजा भवानी मातेला का दिली जाते पलंगावर निद्रा

Chandra Dosh Mukti शरद पौर्णिमेला हे करा धनलाभ मिळवा

एखादा कीटक चावला असेल तर सावधान! कीटक चावल्यास काय करावे

राग केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का?जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केला मोठा खुलासा!

श्रीरामपूर येथे 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर 9 जणांकडून अनैसर्गिक अत्याचार

केंद्र सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट, मोहरी आणि गव्हाच्या MSP मध्ये वाढ

मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्याचे शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान

ओमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीरचे नवे मुख्यमंत्री झाले

पुढील लेख
Show comments