Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भुजबळ फार्मबाहेर रांगोळी काढण्याऱ्या भाजपच्या तिघा महिलांवर गुन्हा दाखल

भुजबळ फार्मबाहेर रांगोळी काढण्याऱ्या भाजपच्या तिघा महिलांवर गुन्हा दाखल
, मंगळवार, 18 जानेवारी 2022 (08:20 IST)
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा  नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ  भुजबळ फार्म या निवासस्थानाबाहेर सोमवारी पहाटे  विद्यापीठ कायद्याच्या निषेधार्थ भाजप युवती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काळी रांगोळी काढून पहाटेला निषेध केला होता. हा निषेध नोंदवणे पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडलेले आहे. महानगर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, युवती शहराध्यक्ष साक्षी दिंडोरकर, संदीप दिंडोरकर यांच्यासह अन्य मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यापीठ बचाव आंदोलन जाहीर निषेध करत हे विधेयक मागे घ्यावे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाकडून विद्यापीठ बचाव आंदोलन करत या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. या प्रकरणी कलम १४४ सीआरपीसी प्रमाणे काढलेल्या आधी सूचनेचे उल्लंघन केले म्हणून कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील निष्पन्न आरोपीविरुद्ध कलम १०७ सीआरपीसी प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मालेगाव दंगलीतील वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण, न्यायालयात आरोपपत्र दाखल