Festival Posters

हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन नांदेडमध्ये एकाचा जागीच मृत्यू , तिघे जखमी

Webdunia
शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (11:59 IST)
कुकर मध्ये कच्ची हळद शिजवताना कुकरचा स्फोट होऊन एका तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाल्याची घटना नांदेडच्या मुखेड तालुक्यात दापका गुंडोपंत येथे काल घडली. सुनील मारवाड असे या मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
 
वृत्तानुसार, हळद शिजवताना कुकर मधून पाणी गळती झाल्याने हा अपघात घडल्याचे वृत्त आहे. कच्ची हळद कुकरमध्ये शिजवताना कुकर मधून पाणी गळती का होत आहे हे बघण्यासाठी सुनील कुकर जवळ गेला  असता कुकरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भयंकर होता की कुकरचे अक्षरश तुकडे होऊन दूरवर जाऊन पडले. या स्फोटात सुनील हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी मुलगा आणि एक अन्य मजूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या अपघातामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर डोंगर कोसळले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करतील

महाराष्ट्रात निवडणूक आयोगाची चूक पकडली, खराब कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित

राम मंदिराच्या ध्वजारोहण समारंभापूर्वी उत्तर प्रदेशात विधानसभा, चारबाग स्टेशन, शाळा उडवून देण्याची धमकी

भाजप नेत्या नाझिया इलाही खान यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या

LIVE: लाडकी बहीण योजना कधीही बंद पडू देणार नाही एकनाथ शिंदे

पुढील लेख
Show comments