Marathi Biodata Maker

एक रकमी परतावा योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येणार

Webdunia
शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (07:33 IST)
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे कर्ज परतफेडीची मुदत संपलेल्या लाभार्थींकरिता संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्यांकरिता एक रकमी परतावा  योजना सुरू करण्यात आली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या कर्ज परतफेडीचे मुदत संपलेले अनेक लाभार्थी असून कर्ज वसुलीसाठीचे प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहेत. त्यासाठी ही योजना 31 मार्च 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
 
राज्यात मागील दोन वर्षांपासून उद्भवलेल्या कोविड 19 च्या गंभीर परिस्थितीमुळे बऱ्याच लाभार्थींचे व्यवसाय बंद झालेले आहेत.त्यांना अशा परिस्थितीत कर्ज परतफेड सुसह्य व्हावे व उदरनिर्वाहासाठी त्यांचे व्यवसाय पूर्ववत सुरु व्हावेत याकरीता महामंडळाने संपूर्ण थकित कर्ज व्याजासह एक रकमी भरणा करणाऱ्या लाभार्थींकरीता एक रकमी परतावा (One Time Settlement OTS) योजनेस मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थीला एकूण थकित कर्जातील व्याजाच्या रक्कमेत 50 टक्के इतकी भरीव सूट देण्यात येणार आहे.या योजनेस महामंडळाच्या दिनांक 15 मार्च 2022 रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. महामंडळाच्या या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

LIVE: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! खात्यात ३००० रुपये येणार

ब्रह्मपुत्र नदीत पोहण्यासाठी गेलेल्या आठ जणांपैकी पाच जण बेपत्ता

आंबेगावमध्ये बिबट्याचा धोका; ८ गावे हॉटस्पॉट घोषित

पुढील लेख
Show comments