Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक

Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (09:21 IST)
मुंबईमध्ये अमित शाह यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यासह आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रविण दरेकरही अमित शाह यांच्या स्वागतासाठी गेले होते.
 
मुंबईत दाखल झाल्यानंतर अमित शाह सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले. याठिकाणी अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अमित शाह हे उद्या सुद्धा दिवसभरात महायुतीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. यानंतर राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
 
महायुतीमधील तीनही प्रमुख पक्षांचा वेगवेगळा जागांवर दावा केला जात आहे. त्यामुळे राज्यातीलअनेक जागांवर तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला आधी शिंदे गटाला मिळतील तितक्याच जागा आपल्यालाही हव्यात, असा दावा होता. विशेष म्हणजे अजित पवार गट १७ जागांवर ठाम आहे. त्यापैकी १० जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे शिंदे गटाचा २३ जागांवर दावा आहे. तर भाजपाकडून महाराष्ट्रात ३२ लोकसभा जागांची मागणी आहे, त्यामुळे हा तिढा अमित शाह कसा सोडवतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत मोठा घोटाळा, नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले

धरणात बुडून आई आणि मुलीचा वेदनादायक मृत्यू

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

पुढील लेख
Show comments