Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धक्कादायक : कल्याण-शीळ मार्गाच्या कडेला कचऱ्यात एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक सापडले

Webdunia
सोमवार, 20 जुलै 2020 (11:21 IST)
भर पावसात कल्याण-शीळ मार्गाच्या कडेला कचऱ्यात एक दिवसाचे स्त्री जातीचे A one-day-old female अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (18 जुलै) दुपारी उघडकीस आला. शीळ डायघर पोलिसांना याविषयी माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला नवी मुंबई येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी अनोळखी पालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >कल्याण शीळ मार्गावर वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. शनिवारी Saturday दुपारीही रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. पावसाच्या सरीही बरसत होत्या. याचदरम्यान रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यातून बाळाचा रडण्याचा आवाज आला. थर्माकॉलचे अनेक बॉक्स येथे पडलेले असल्याने नागरिकांनी आवाजाचा शोध घेतला. तर एक नवजात अर्भक लाल कपड्यात गुंडाळलेले आढळून आले. याप्रकरणी शीळ-डायघर पोलिसांना तातडीने कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला ताब्यात घेतले. शनिवारी दुपारी रिव्हरवूड पार्क परिसरात कल्याण शीळ रोडवरील बाजूच्या कचऱ्यात एक नवजात स्त्री जातीचे अर्भक मिळाले आहे. हे बाळ नुकतेच जन्मलेले आहे, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याची प्रकृती उत्तम आहे. सध्या नवी मुंबई नेरुळ येथे त्याला हलविण्यात आले आहे. आजूबाजूच्या परिसरात बाळाच्या पालकांचा शोध घेतला जात आहे. सी. जे. जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शीळ डायघर पोलिस ठाणे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments