Marathi Biodata Maker

औरंगाबादेत सैराटची पुनरावृत्ती, बहिणीवर प्रेम करणाऱ्याची भरदिवसा हत्या

Webdunia
शुक्रवार, 30 डिसेंबर 2022 (11:42 IST)
औरंगाबाद जिल्ह्यात बहिणीवर प्रेम करणाऱ्या एका तरुणाची  भरदिवसा पुणे महामार्गावर कुऱ्हाडयाने वार करून निर्घृण हत्या करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापू खिल्लारे(30)असे या मयत तरुणाचं नाव आहे. बापू खिल्लारे यांनी आरोपीच्या बहिणीशी घरातील लोकांचा विरोधात जाऊन 3 वर्षांपूर्वी एका तरुणीशी प्रेम विवाह केला. हा राग तरुणीचा भावाचा मनात होता. 
 
गुरुवारी 29 डिसेंबर रोजी बापू औरंगाबाद -पुणे महामार्गावरून दुचाकीने जात असताना त्यांना त्यांच्या मेहवण्याने महामार्गावरील दहेगाव बंगल्या जवळ इसरवाडी फाटा येथे अडवून त्यांच्यावर कुऱ्ह्याडने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे बापू कोसळून खाली पडून तडफडत होते. रस्त्यावरील ये जा करणाऱ्या वाहनधारकांनी हे भयानक दृश्य पहिले आणि त्यांचा थरकाप उडाला .

एका प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की वार झाल्यामुळे बापू तडफडून शांत झाला. त्याला मृत पाहून आरोपीने जल्लोष करत अंगातील शर्ट कडून हवेत फिरवत नृत्य करून पसार झाला. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाची नोंद घेतली आहे. आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले  आहे. 
 
Edited By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

IPL 2026 Auction: सुनील गावस्कर भडकले, अशा खेळाडूंवर एक सेकंदही वाया घालवू नये

सोन्याच्या कानातल्यांसाठी मुलीचे कान कापले; तिच्या कुटुंबाला ती शेतात बेशुद्धावस्थेत आढळली

गुजरातमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, रिश्टर स्केलवर तीव्रता 3.1 मोजली

Indian Celebrities Cancer Death 2025 कर्करोगाने या तेजस्वी तार्‍यांना आपल्याहून कायमचे दूर नेले

केंद्र सरकार महागाई आणि घसरत्या रुपयावरून लक्ष वळवत आहे- नाना पटोले

पुढील लेख
Show comments