Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महापालिकेकडून 3,269 दुकानांसह आस्थापनांची झडती

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (08:19 IST)
मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत 25 नोव्हेंबर रोजी तर, मुंबई महापालिकेने दिलेली मुदत 27 नोव्हेंबर रोजी संपली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आजपासून (28 नोव्हेंबर) दुकाने, हॉटेल्स आणि आस्थापनांनी झाडाझडती घेण्यास व कारवाईला सुरुवात केली आहे.

आज पहिल्याच दिवशी पालिकेच्या पथकाने 24 वार्डातील 3 हजार 269 दुकाने व आस्थापनांना भेटी दिल्‍या. या भेटीत मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात 3 हजार 93 पाट्या आढळून आल्या. तर, सर्वोच्च न्यायालय व महापालिकेच्या आदेशाचे, नियमांचे पालन न करणाऱ्या आणि मराठी भाषेत व ठळक अक्षरात पाट्या न लावणाऱ्या 176 दुकाने व आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्वात जास्त म्हणजे घाटकोपर परिसरात 18 ठिकाणी, भांडुपमध्ये 14 ठिकाणी, खार-वांद्रे 12 ठिकाणी तर, वडाळा व शिवडी परिसरात सर्वात कमी म्हणजे 4 ते 5 ठिकाणी कारवाई करण्यात आली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फ़ुटबाँल मैदानात इमारतीचे शेड कोसळून भीषण अपघात, 8 मुले जखमी

पतीनेच केले पत्नीचे अपहरण, केस नोंदवून घेत नाही म्हणून पोलिसांवर आरोप

महाराष्ट्रातील 10 % मराठा आरक्षणाला धोका? बिहारच्या निकालाचा किती परिणाम होणार?

पेपरलीक रोखण्यासाठी नवीन कायदा लागू, 10 वर्षे तुरुंगवास आणि 1 कोटींच्या दंडाची तरतूद

पुणे पोर्श कार अपघात: अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांना जामीन

सर्व पहा

नवीन

ENG vs SA : दक्षिण आफ्रिकेची इंग्लंडला पराभूत करून विजयी मालिका सुरू

Russia Ukraine War: कीव अमेरिकन शस्त्रांच्या मदतीने रशियात घुसून प्रत्युत्तर देणार

भारत 2036 ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणार

कॉफी नेमकी किती आणि केव्हा प्यावी? कॅफीनचा शरीरावर काय परिणाम होतो?

मेंढपाळ कुटुंबात जन्म ते ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन, कोण आहेत लक्ष्मण हाके?

पुढील लेख
Show comments