Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षिका रागावल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Webdunia
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (17:51 IST)
अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील देवठाण गावाच्या एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने शिक्षिका रागावल्यामुळे आत्महत्या केली आहे.  या विद्यार्थ्याचे नाव सौरभ मच्छिंद्र सोनवणे (वय १७) असं आहे. सौरभच्या वडिलांनी त्याच्या वर्गशिक्षिकेच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शिक्षिका रागवल्यामुळे मुलानं आत्महत्या केली, असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, सौरभने केलेल्या तक्रारीनुसार आढळा विद्यालयातील शिक्षिका व्ही. डी. सहाणे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
सौरभ मंगळवारी दुपारच्या सुट्टीनंतर शाळेतून निघून गेला होता. त्याचे दफ्तर शाळेतच होते. पाच वाजता त्याच्या वडिलांना तो शाळेत नाही, असे सांगण्यात आले. त्यानंतर शिक्षक, पालक आणि वर्गातील विद्यार्थ्यांनी सौरभचा शोध घेतला. परंतु, सौरभचा पत्ताच लागला नाही. बुधवारी सौरभच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. अखेर रविवारी संध्याकाळी आढळा नदिपात्रातील एका विहिरीत सौरभचा मृतदेह आढळला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी सौरभच्या वर्गशिक्षिकेवर आरोप केले आहेत. 

संबंधित माहिती

अजित पवार कठीण प्रसंगाने घेरले, निवडणूक आयोगाने दिले कारवाईचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अशोक चव्हाण यांना जेलमध्ये पाठवण्याचे वचन पूर्ण करतील का? काँग्रेस नेता जयराम रमेश यांचा प्रश्न

आजोबाकडून नातीवर 10 वर्षांपासून बलात्कार, गप्प बसण्यासाठी जीवे मारण्याची धमकी

नवनीत राणा यांच्याशी जोडलेल्या प्रश्नांवर भडकले संजय राउत, म्हणालेत-मला मराठी शिकवू नका

लॉरेन्स बिश्नोईचा माणूस येतोय मुंबईत, पोलिस नियंत्रण कक्षाला आलेला कॉल !

अवैध संबंध हा घटस्फोटाचा आधार, मुलाच्या ताब्यासाठी नाही, मुंबई उच्च न्यायालय

काँग्रेसला मतदान करून आपले मत नष्ट करू नका’, संजय निरुपमचे मोठे वक्तव्य

एअर इंडियाचा मोठा निर्णय, रद्द केलीत दुबई आणि तेल अवीवचे उड्डाणे

पश्चिम रेल्वे मुंबई आणि अहमदाबाद ते राजस्थानसाठी तीन जोडी उन्हाळी विशेष गाड्या चालवणार, जाणून घ्या वेळापत्रक.

मुंबईत शॉपिंग सेंटरच्या टॉयलेटमध्ये महिला वकिलाचा विनयभंग, जिवे मारण्याचा प्रयत्न

पुढील लेख
Show comments