Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

होम-स्टे रूमच्या भाड्यावरून झालेल्या वादातून हरिहरेश्वरमध्ये पर्यटकांनी एका महिलेला चिरडले

Webdunia
सोमवार, 21 ऑक्टोबर 2024 (18:55 IST)
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.होम-स्टे रूमच्या भाड्यावरून झालेल्या वादातून हरिहरेश्वरमध्ये पर्यटकांनी एका महिलेवर एसयूव्ही चढवली या मध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी श्रीवर्धन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली असून ज्योती नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. सर्व आरोपी पुण्यातील पिपरी चिंचवड येथून हरिहरेश्वर येथे आले होते.

मद्यधुंद पर्यटकांना होम स्टेमध्ये खोल्या नाकारण्यात आल्याने वाद सुरू झाला. यानंतर मारामारीची घटना घडली आणि तेथून पळून जात असताना पर्यटकांनी ज्योतीला त्यांच्या कारने चिरडले, त्यात तिचा मृत्यू झाला.

हे पर्यटक पुण्यातील पिंपरी चिंचवडचे रहिवासी असून त्यात एका नगरसेवकाच्या मुलाचाही समावेश आहे.
रात्री दीडच्या सुमारास हे पर्यटक स्कॉर्पिओने तेथे आले होते आणि त्यांना श्री अभि धामणस्कर येथील ममता होम स्टेमध्ये खोली घ्यायची होती. मात्र, पर्यटक अत्यंत मद्यधुंद अवस्थेत असल्याने धामणस्कर यांनी त्याला खोली देण्यास नकार देत दुसरीकडे जाण्यास सांगितले.

त्यामुळे संतप्त झालेल्या पर्यटकांनी धामणस्कर यांना मारहाण केली. दरम्यान, पळून जात असताना पर्यटकांनी धामणस्कर यांची ३४ वर्षीय बहीण ज्योती हिला स्कॉर्पिओने चिरडले. दरम्यान, स्थानिक लोकांनी एका पर्यटकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी श्रीवर्धन पोलिसांनी आणखी दोन आरोपी पर्यटकांना अटक केली. आरोपी पर्यटकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर

LIVE: एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध

एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध

बिडेनने महत्त्वपूर्ण हवामान-संबंधित उपक्रमांची घोषणा केली

पुढील लेख
Show comments