Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बुलेटवर पाठीमागे बसलेला तरूण ठार

बुलेटवर पाठीमागे बसलेला तरूण ठार
Webdunia
सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (14:59 IST)
नाशिक : पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपुलावर भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बुलेटवर पाठीमागे बसलेला तरूण ठार झाला. शुभम रामगोपाल पांडे (२५ रा.समाजमंदिरामागे महालक्ष्मीनगर,अंबड) असे मृत तरूणाचे नाव असून, याप्रकरणी तेजस भिकाजी राणे (२९ रा.कृष्ण नगर,कामटवाडे) यानी तक्रार दाखल केली आहे. या अपघातात बुलेटचालकही जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पसार झालेल्या अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडे व राणे हे दोघे मित्र शनिवारी सायंकाळच्या सुमारास एमएच १५ एफपी २२९१ या बुलेट दुचाकीवर महामार्गाच्या उड्डाणपूलावरून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. द्वारका कडून आडगावच्या दिशेने चालक राणे याच्या पाठीमागे बसून पांडे प्रवास करीत असतांना पंचवटी कॉलेज समोर उड्डाणपूलावर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने बुलेटला धडक दिली. या अपघातात दोघे मित्र गंभीर जखमी झाले होते. त्यातील पांडे याचा मृत्यू झाला असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE:मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज ,मनसे कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह

कुणाल कामरा यांना देशविरोधी संघटनांकडून 4 कोटी रुपये मिळाल्याचा शिवसेना नेते निरुपम यांचा मोठा आरोप

CBSE ने इयत्ता 9 वी ते 12 वी साठी नवीन अभ्यासक्रम जारी केला

आरएसएस स्वयंसेवक स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी काम करतात-मोहन भागवत

कामाख्या एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले, अपघातात 7 जखमी

पुढील लेख
Show comments