Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपकडून सत्तेचा गैरवापर, तुम्ही नेहमी लोकांना मूर्ख बनवू शकत नाही : भुजबळ

Webdunia
शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:20 IST)
आम्ही जास्त बोलत असल्याने कदाचित लोकं दुखावतअसतील.पण आम्ही राजकारणामध्ये विचाराची लढाई लढतो. त्यामुळे आम्ही सत्य मांडतो. पण माणसं दुखावली जातात.हल्ली हे जास्तच व्हायला लागलं.लोक पटदिशी दुखावतात आणि हातात असलेल्या सत्तेचा ताबडतोब गैरवापर करायला सुरुवात करतात.राजकारणात सहनशक्ती हवी.राजकारणात आम्हाला जसे हार पडतात, तसे प्रहार झेलण्याची शक्तीही असायला हवी.त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने छळवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लोकांना सगळं समजतं. यांच्यामागे पोलीस लावले, ईडी लावली हे अमकं केलं तमकं केलं…पण निवडणुका येतात.सदा सर्वकाळ तुम्ही लोकांना मूर्ख बनवू शकत नाही.अनेक सरकारे पाहिली.काँग्रेसची,वाजपेयींचीही पाहिली.आता केंद्रात जे चाललंय ते अशोभनीय आहे,असा चिमटा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज भाजपला काढला.
 
महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर भुजबळ आज पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले.यावेळी ढोल ताशे वाजवत आणि फटाके फोडून भुजबळांचं जंगी स्वागत करण्यात आलं.भुजबळांच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे भरवत, ढोलाच्या तालावर ठेकाही धरला महिलांनी भुजबळांचं औक्षण केलं तर कार्यकर्त्यांनी त्यांना भला मोठा हार घातला. त्यानंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी गप्पा मारता मारता आपल्या खास शैलीत भाजपवर आसूडही ओढले. सरळ वागता की तुमचा भुजबळ करू, असा वाकप्रचार त्यांनी सुरू केला होता. आता मी निर्दोष सुटलो. त्यांना हा वाकप्रचार वापरता येणार नाही. त्यांना दुसरं काही तरी शोधावं लागेल, असा खोचक टोला छगन भुजबळ यांनी लगावला.
 
राजकारणात शब्दाने शब्दाला उत्तर दिलं जातं आणि विचाराने विचाराला.परंतु, हल्लीच्या काळाज अडचणीत टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे.आता तर अधिकच अडचणीत टाकलं.त्यातूनच बाहेर वाकप्रचार सुरू झाला तुम्ही सरळ वागता की तुमचा भुजबळ करू.आता त्यांना तो वाकप्रचार वापरता येणार नाही.दुसरं काही तरी शोधावं लागेल,असा चिमटा त्यांनी काढला.
 
आम्ही तुरुंगात असताना नाशिकमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती एवढा मोर्चा नाशिककरांनी पाहिला. या मोर्चाला १२ ते १५ लाख लोक उपस्थित होते असा पोलिसांचा रिपोर्ट आहे. अनेक वयोवृद्ध आणि माताही या मोर्चात सहभागी झाल्या. केवळ भुजबळांना सोडावं या मागणीसाठी ते रस्त्यावर उतरले होते. अर्थात कायदेशीर मार्गानच जावं लागतं. त्याला पर्याय नसतो. पण माझी सुटका व्हावी म्हणून महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते आले होते. अनेक कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी मेहनत घेतली होती. त्यामुळे आत्मबळ वाढलं होतं. भुजबळांवर आरोप निराधार आहेत. ते निष्कलंक आहेत. आज ना उद्या ते बाहेर येतील असं वाटल्यानेच जनता रस्त्यावर उतरली, असं त्यांनी सांगितलं.
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments