Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Accident: भरधाव ट्रकने 12 वाहनांना चिरडलं

Webdunia
सोमवार, 8 एप्रिल 2024 (12:30 IST)
नागपुरात मानकापूर परिसरात भरधाव जाणाऱ्या एका ट्रक 12 वाहनांना जोरदार धडक दिली. या मध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि 2 दुचाकींचा समावेश आहे. या अपघातात वाहनांचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 
 
सदर घटना नागपुरातील मानकापूर चौकात घडली आहे. उड्डाण पुलावरून येणाऱ्या भरधाव ट्रकने सिग्नलवर थांबलेल्या चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या धडकेत सुमारे पाच ते सहा हुन अधिक कारांचे नुकसान झाले आहे.या कार मधील चार प्रवाशांना दुखापत झाली आहे. या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की, वाहने एकमेकांवर आदळली.अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अपघातांनंतर घटनास्थळी  लोकांनी गर्दी केली होती. 
वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक लाल सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर मागून धडकला आणि त्यांनतर कार दुसऱ्या कारवर  जाऊन आदळली काही कार आणि दुचाकी या सोबत फरफटत गेल्या. या अपघातात एक दुचाकी या वाहनाच्या खाली चिरडली गेली. या अपघातात चौघे जण जखमी झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

अपघाताची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि वाहतूक सुरळीत केली. जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे कारण पोलीस शोधत आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा

आरएसएस मुख्यालयाच्या भेटीवर संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला

बीड जिल्ह्यात मशिदीत मध्यरात्री रात्री मोठा स्फोट

LIVE: प्रत्येक गोष्टीवर वाद निर्माण करण्याची गरज नाही, वाघ्याच्या स्मारकावर फडणवीसांचे विधान

पुढील लेख
Show comments