मान्सूनचा आगमन केरळ मध्ये झाला असून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.यंदा राज्यात सरासरीच्या तुलनेत 5 टक्के जास्त पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि कमी तापमान याचा परिणाम होऊन जुलै महिन्यात धुळे, अकोला, राहुरी, पाडेगाव, कोल्हापूर आणि पुणे भागात पावसात खंड राहण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी पत्रकार परिषेदत वर्तवण्यात आली आहे.
येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जनेसह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
यंदा सरासरीपेक्षा 99 टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवली आहे. तर जून ते सप्टेंबर महिन्याच्या काळात पावसाची शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची दमदार हजेरी लागण्याची शक्यता वर्तवली आहे.
यंदा सरासरीपेक्षा 5 टक्के जास्त पावसाची शक्यता साबळे यांनी वर्तवली असून ते म्हणाले पश्चिम विदर्भ विभागात 98 टक्के, पूर्व विदर्भ विभागात 103 टक्के, मध्य विदर्भात 98 टक्के, मराठवाड्यात 97 टक्के कोकण विभागात 106 टक्के उत्तर महाराष्ट मध्ये 98 टक्के तर पश्चिम महाराष्टात 97 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.