Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला

Webdunia
गुरूवार, 13 एप्रिल 2023 (07:54 IST)
आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. बंडखोरी होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असणाऱ्या ‘मातोश्री’वर आले होते. मातोश्रीवर येऊन एकनाथ शिंदे रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे. संबंधित चाळीस आमदार केवळ स्वत:ची जागा वाचवण्यासाठी आणि पैशांसाठी तिकडे गेले आहेत, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. ते एका इंग्रजी वृत्तवाहिनीश संवाद साधत होते.
 
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे चाळीस लोक त्यांच्या स्वत:च्या जागांसाठी आणि पैशांसाठी भाजपाबरोबर गेले आहेत. तिकडे जाण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. केंद्रीय तपास यंत्रणा अटक करतील, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री मातोश्रीवर येऊन रडले होते. भाजपाबरोबर चला नाहीतर मला अटक होईल, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं” असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments