Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अद्वय हिरे यांना न्यायालयाचा दिलासा नाहीच; मालेगाव न्यायालयाने जामीन फेटाळला

Webdunia
बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (07:59 IST)
रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन अर्ज फेटाळला.अद्वय हिरे यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.
 
नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी युक्तिवात करताना सांगितलं की, अद्वय हिरे यांनी घेतलेले 7 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज आज 32 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही.तसेच ते पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता इतरत्र वापरले.  म्हणून त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
 
अद्वय हिरे यांना जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. तसेच त्यांचा जामीन नाकारल्याने ठाकरे गटाचा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय.

नेमकं प्रकरण काय?:
मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले.

यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या दोन्ही युक्तीवादानंतर बँकेला सुट्टी असल्याने कर्ज प्रकरणात बँकेचे इतिवृत्त तपासणे बाकी आहे, कर्ज प्रकरणी अजूनही काही लोकांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे कारण सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

NEET पेपर लीकचे महाराष्ट्र कनेक्शन: लातूरमध्ये 4 जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या पक्षात जाणार

प्रेमसंबंध, अपहरण, फॅनची हत्या आणि सुपरस्टारला अटक; सिनेमात नाही खरंच घडलेला गुन्हा

वादग्रस्त फोटो, गोहत्येची अफवा आणि मुसलमानांच्या दुकानावर हल्ला, हिमाचल प्रदेशात काय घडलं?

लोकसभा अध्यक्षांची निवड कशी होते? हे पद महत्त्वाचं का आहे?

सर्व पहा

नवीन

डोंबिवलीच्या हाय प्रोफाइल सोसायटीमध्ये गोंधळ, गार्ड्सची हॉटेल मालकाला मारहाण

शिंदे सरकार धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देणार, आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

हिंदुजा कुटुंबातील सदस्यांची मानवी तस्करीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

जळगावात शिंदेंच्या सभे नंतर पैसे वाटप करण्याचा सुषमा अंधारेंचा आरोप

गडचिरोलीत पत्नीसह नक्षलवाद्याने आत्मसमर्पण केले

पुढील लेख
Show comments