Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ahmednagar : स्मशानभूमीत झाला आगळा वेगळा विवाह सोहळा

Webdunia
मंगळवार, 25 जुलै 2023 (11:37 IST)
स्मशानभूमी म्हटलं की डोळ्यासमोर येतं अशे ठिकाण जिथे जळत असलेले प्रेत , प्रेतावर होणारे अंत्यसंस्कार, रडण्याचा आवाज पण त्याच शमशानभूमीत सनई, आणि मंगलाष्टकाचा आवाज ऐकू आला तर हे नवलच आहे. अहमदनगरच्या एका स्मशानभूमीत आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. ज्या ठिकाणी आयुष्याचा शेवट होतो त्याच ठिकाणी एका जोडप्यानं थाटामाटात आपल्या नव्या संसाराची सुरुवात केली. 

अहमदनगरच्या राहाता स्मशानभूमीत स्मशानजोगी म्हणून गंगाधर गायकवाड आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांची मुलगी या श्मशानात लहानाची मोठी झाली. बारावीच्या शिक्षणानंतर ती आईवडिलांना आर्थिक भार लावण्यासाठी खासगी कंपनीत नौकरी करू लागली. तिथे तिची ओळख प्रेम मनोज जैस्वालशी झाली. पुढे त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देत लग्न करण्याचे ठरविले. दोघांच्या घरून परवानगी मिळाल्यावर त्यांनी मयुरीच्या राहत्या घरात म्हणजे चक्क श्मशानात लग्न करण्याचे ठरविले. 

श्मशानात सनई चौघड्याच्या मध्ये मंगलाष्टक आणि अक्षतांची उधळण करून त्यांनी एकमेकांना साथ देण्याचे वचन  देत लग्नगाठ बांधली. श्मशानात लग्न केल्यामुळे या लग्नाची चर्चा होत आहे.  माजी नगराध्यक्षा ममता पिपाड आणि त्यांचे पती यांनी कन्यादान केले. आणि मयुरीला संसारोपयोगी साहित्य दिले. 
 
 Edited by - Priya Dixit 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

बीडमध्ये सासऱ्याच्या प्रेम विवाहाची सुनेला शिक्षा, पंचायतीचा धक्कादायक निकाल

रश्मी शुक्ला यांना डीजीपी पदावरून हटवण्याची काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

israel hezbollah war:हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाह ठार

ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, ईमेल आल्याची पुष्टी!

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची भीती! पोलीस अलर्ट मोडवर

पुढील लेख
Show comments