Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहित महिलेच्या घरात ‘तो’अश्लील मजकुराच्या चिठ्ठ्या टाकायचा

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (08:26 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील मडकी गावात एक विवाहित पुरुष एका विवाहित महिलेच्या घरात अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या टाकायचा. एकदा तिने त्याला खिडकीतून चिठ्ठी टाकतानापाहिले आणि आपल्या पतीला सांगितले. पती त्या पुरुषाकडे विचारणा करण्यासाठी गेले असा त्याने, त्याच्या पत्नीने या पीडित दाम्पत्यावरच हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हल्ला करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तिघांविरुद्ध
नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्ती भानुदास वरकड, भरत वरकड व एक महिला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी यातील फिर्यादी महिलेस आणि तिच्या पतीला शिवीगाळ करूनजीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण एकाच गावातील आणि जवळच राहणार आहेत.नेवासा तालुक्यातील मडकी गावात हे दाम्पत्य राहते. गेल्या चार-पाच महिन्यांपासून महिलेच्या घरात अश्लील मजकूर लिहिलेल्या चिठ्ठ्या येत होत्या. याचा त्या महिलेला त्रास होत होता. एक दिवस खिडकीतून चिठ्ठी टाकताना महिलेने निवृत्ती मरकड याला पाहिले. तो आधीपासूनच महिलेवर वाईट नजर ठेवून होता. त्यानेच चिठ्ठी टाकल्याची खात्री झाल्यावर महिलेने हा प्रकार पतीला सांगितला.
त्यांनी वरकड याच्या घरी जाऊन यासंबंधी विचारणा केली. याचा राग येऊन त्याने हातात खोरे घेऊन अंगावर धावून आला. तर भारत वरकड हातात काठी घेऊन मारण्यासाठी धावला. या दाम्पत्यास शिवीगाळ केली. मारहाण करण्यासाठी त्यांच्या अंगावर हे सर्वजण धावून गेले. जीवे मारण्याची धमकीही दिली.
त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत दाम्पत्याने पोलिस ठाणे गाठले. तेथे पोलिसांना घडला प्रकार सांगितला. यासंबंधी पीडित महिलेच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

जॉर्जियामधील रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय मृत आढळले

LIVE: फडणवीस मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवारही संतप्त

परभणी हिंसाचार आणि सरपंच हत्या प्रकरणावर चर्चा करण्यास फडणवीस सहमत

ठाण्यात कलयुगी बापाने आपल्या मुलीवर बलात्कार केला

अदानीविरोधात याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दंड

पुढील लेख