Marathi Biodata Maker

बीड जिल्हा परिषदेतील पराभवास कारणीभूत असलेल्यांवर राष्ट्रवादी नेतृत्वाकडून लवकरच कठोर कारवाई

Webdunia
बुधवार, 22 मार्च 2017 (22:18 IST)
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पक्षाशी व मतदारांशी द्रोह करणाऱ्यांवर पक्षनेतृत्व लवकरच कठोर कारवाई करेल, अशी माहिती विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यातील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीने झटत असताना व त्यांच्या परिश्रमांवर लोकमान्यतेची मोहर उमटलेली असताना पक्ष उमेदवाराचा झालेला पराभव कार्यकर्ते व मतदारांच्या जिव्हारी लागला आहे. यासंदर्भात पक्षभावना अत्यंत तीव्र आहेत. पक्षाच्या जीवावर आमदारकी, राज्यमंत्रीपद उपभोगल्यानंतरही पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल, अशा पक्षविरोधी कारवाया कदापीही सहन केल्या जाणार नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

बांगलादेशात हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला, नंतर पेट्रोल ओतून जाळून टाकले

हे काय ! शिवसेनेच्या उमेदवाराने स्वतःच्याच नेत्याचा एबी फॉर्म फाडून गिळला

चालत्या व्हॅनमध्ये क्रूरता, नंतर पीडितेला रस्त्यावर फेकून दिले; या प्रकरणाने देशाला हादरवून टाकले

आदित्य ठाकरेंच्या कोअर टीमला मोठा धक्का: शीतल देवरुखकर-शेठ उद्धव ठाकरेंच्या पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये सामील

बीएमसी निवडणुकीत मतविभाजनाची भीती संपली ? ३२ जागांवर 'तिसरी आघाडी' नसेल, दोन आघाड्या आमनेसामने येतील

पुढील लेख
Show comments