Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अजित पवार म्हणाले यात राजकारण करण्यासारखं काहीच नाही

Webdunia
शनिवार, 15 जानेवारी 2022 (15:29 IST)
पंतप्रधानांच्या बैठकीला मुख्यमंत्री गैरहजर राहिले यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही, यावरून राजकारण किंवा टीका टिप्पणी करायचं कारण नाही. राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणं हे मुख्यमंत्र्यांचं काम आहे, ते व्यवस्थित सुरु आहे. त्यांच्या टीमचे सहकारी म्हणून आम्ही, तसेच इतर सर्व अधिकारी योग्य काम करत आहेत. टास्क फोर्समधील विख्यात डॉक्टर्स या सर्व प्रकारावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्रीदेखील स्वतः दररोज या सर्व घडामोडींचा आढावा घेतात. त्यामुळे यात राजकारण करण्यासारखं काहीच नाही.’
 
अजित पवार म्हणाले की, प्रत्येक वेळी मीटिंगला प्रत्येकानेच उपस्थित राहणे आवश्यक नसते. कुणाची काही अडचण असू शकते. कुणी कोरोनामुळे क्वारंटाइन असतं. मात्र पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सीताराम कुंटे, दिलीप चक्रवर्ती आदी उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील लसीकरणाविषयीची समस्या मांडली. 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रांकडे येत आहेत. मात्र लसीचे डोस कमी पडत आहे. हा पुरवठा वाढवण्यासंबंधीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. तसेच साठ वर्षांपुढील व्यक्तींनी बूस्टर डोस घ्यावा, असं सांगितलं जातंय, त्याकरिताही केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली असे सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुपुष्यामृतयोग 2024 : पुष्य नक्षत्रावर सुख-समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य खरेदी करा

दिवाळीच्या इतिहासाशी निगडित ही माहिती तुमच्यासाठी नवी असू शकते

Diwali Muhurat Trading History दिवाळी मुहूर्त व्यापार कधी सुरू झाला?

Hair Care हे तेल केसांना लावल्याने होतील खूप फायदे

लवकर उठण्याचे हे 5 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

होम-स्टे रूमच्या भाड्यावरून झालेल्या वादातून हरिहरेश्वरमध्ये पर्यटकांनी एका महिलेला चिरडले

महाराष्ट्र निवडणुकीवर काँग्रेसची मोठी बैठक आज, लवकरच उमेदवारांची घोषणा होणार

मुलांनी भरलेली स्कूल बसचा रस्ता अपघात, एकाचा मृत्यू

जहांगीरपुरी येथे गोळीबारात एकाचा मृत्यू, दोघे जखमी

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 24 ऑक्टोबरपासून पुण्यात होणार

पुढील लेख
Show comments