Festival Posters

सावधान शेतकरी मित्रांनो, अनधिकृत खत विक्रेते बाजारात तुमची होऊ शकते फसवणूक

Webdunia
लातूर तालुक्यातील नांदगाव शिवारात अनाधिकृतपणे खताची विक्री होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार कृषि विकास अधिकारी बी.एस. रणदिवे, मोहिम अधिकारी एस.बी. देशमुख, कृषि अधिकारी पंचायत समितीचे एस. एस. शिंदे यांच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने चौकशी केली असता शिवकुमार कुसनुरे हा इसम नांदगाव या गावामध्ये ट्रकद्वारे खते घेऊन येतो व शेतकऱ्यांना विक्री करतो असे शेतकऱ्यांनी सांगितले. या इसमाने अधिकृत खत विक्री परवाना नसताना शेतकऱ्यांना कच्च्या पावतीव्दारे खत विक्री केल्याचे आढळले. 
 
विक्री केलेल्या खताचे नाव सिध्दी गोल्ड प्रोम असून उत्पादक कंपनीचे नाव खेतान क्रॉप सायन्स, भरुच व वितरक कंपनीचे नाव ओम साई फर्टिलायझर्स, शिरपूर असे आहे. शिवकुमार कुसनुरे याने विक्रीच्या उद्येशाने ठेवलेल्या ८० खत बॅग साठयास विक्री बंद आदेश देवून तपासणीसाठी खत नमुने घेण्यात आले. अधिकृत खत विक्री परवाना नसलेल्या व्यक्तीने खत विक्री करणे, उत्पादक/वितरक/ विक्रेत्याने खत विक्री करताना कुठलेही बील विहीत नमुन्यात न देणे, अभिलेखे न ठेवणे, उत्पादक/वितरक/ विक्रेत्याने संगनमत करुन शेतकरी व शासनाची फसवणूक केल्याने खत नियंत्रण आदेश १९८५ मधील कलम ७, ५ व ३५ तसेच भारतीय दंडविधान १८६० चे कलम ४२०, ३४ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ०३ नुसार गुन्हा केला असल्याने शिवकुमार कुसनुरे, ओम साई फर्टिलायझर्स, शिरपूर व खेतान क्रॉप सायन्स, भरुच यांचे विरुध्द एम.आय.डी.सी. लातूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

रस्ते अपघातातील बळींना ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार; मंत्री नितीन गडकरी

रक्ताने माखलेला भूतकाळ, तुरुंगात फुललेले प्रेम आणि आता लग्न...प्रिया सेठच्या गुन्ह्याची कहाणी

विद्यार्थिनी NEET परीक्षेला बसू शकली नाही; ग्राहक न्यायालयाने भारतीय रेल्वेला ठोठावला 9 लाख रुपयांचा दंड

UGC Equity Rules: भेदभावाबाबत UGC च्या नवीन मार्गदर्शक तत्वांवरून वाद का निर्माण झाला आहे? नवीन नियम काय म्हणतात?

देशभरातील हवामान बिघडणार, सात राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा जारी

पुढील लेख
Show comments