Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमित ठाकरेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला पण मी त्यांची रिप्लेसमेंट नाही

Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (20:41 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील संजय राऊतांवर खोचक शब्दांत टिप्पणी केली आहे. अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर असून शनिवारी पत्रकार संघात मनसे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी माध्यमांशी संवाद साधून भूमिका मांडण्यासंदर्भात काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना अमित ठाकरेंना विनंती केल्यानंतर अमित ठाकरेंनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला.
 
नेमकं झालं काय?
अमित ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणीसंदर्भात अमित ठाकरे दौरा करत आहेत. या दौऱ्यादरम्यान स्थानिक मनसे पदाधिकारी आणि विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. शनिवारी त्यांनी यासंदर्भात पुणे मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात हजेरी लावली होती. काही स्थानिक मनसे पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी यावेळी साधला. यावेळी बोलताना एका मनसे पदाधिकाऱ्यानं त्यांना मिश्किलपणे वृत्तवाहिन्यांसमोर भूमिका मांडून त्यांना बातम्या देण्यासंदर्भात विनंती करताच अमित ठाकरेंनी त्यावरून संजय राऊतांचं नाव घेत टोला लगावला. यावेळी आपण त्यांची रिप्लेसमेंट नाही, असं देखील अमित ठाकरे म्हणाले.अमित ठाकरेंना मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या होत्या. त्याबद्दल बोलताना “२० दिवस मला रोज हेच विचारलं जायचं की मंत्रीपद मिळणार आहे का? हे खोटं वृत्त असल्याचं सांगून सांगून मी कंटाळलो. शेवटी मी म्हटलं गृहमंत्रीपद देणार असतील तर विचार करेन”, असं अमित ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला घ्यावी लागणार माघार?

LIVE: महायुतीच्या विजयानंतर संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले म्हणाले-किरीट सोमय्या

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

अजित पवार यांनी मतदार बांधवांचे आभार मानत अशी प्रतिक्रिया दिली

महायुतीचा विजय सहन नाही झाल्याने संजय राऊतांनी मानसिक संतुलन गमावले-किरीट सोमय्या

पुढील लेख
Show comments