rashifal-2026

माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ

Webdunia
शनिवार, 28 ऑक्टोबर 2023 (07:32 IST)
मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या 881 स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे दिनांक 27 ऑक्टोबर2023 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.
 
यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोविंदराज, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पश्चिम रेल्वेचे मुख्य महाव्यवस्थापक कुशल सिंह, विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा आदींची प्रमुख उपस्थिती होती
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. देशभक्ती वाढीस लावणारा ‘माझी माती माझा देश’ कार्यक्रमाची सुरूवात 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदानातून झाली होती.


Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

साप्ताहिक राशिफल 09 नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025

बिहारचे प्राचीन नाव काय होते? महाभारत काळात त्याचा राजा कोण होता?

10 special gift ideas for birthdays वाढदिवसासाठी १० खास भेटवस्तू कल्पना

साठीतही चेहऱ्यावर पंचविशीतली लकाकी कशी टिकवाल? या चीनी पद्धतीचे रहस्य

सर्व पहा

नवीन

पार्थ पवारांच्या कंपनीला मुद्रांक विभागाचा धक्का: ४२ कोटींच्या दंडाची नोटीस, व्यवहार रद्द होण्यास अडचण

हवामान अपडेट: दक्षिणेत जोरदार पाऊस, तर मध्य भारताला 'थंड लाटे'चा तडाखा; IMD चा इशारा

LIVE: लंडनमधील इंडिया हाऊस महाराष्ट्र सरकारच्या मालकीचे होणार

पुण्यात भाजपची मोठी रणनीती, बावनकुळे म्हणाले निवडणुकीची तिकिटे सर्वेक्षणावर आधारित असतील

मुंबई: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतून लोखंडी रॉड पडल्याने ३० वर्षीय ट्रक हेल्परचा मृत्यू

पुढील लेख
Show comments