Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औषधांच्या ओव्हर डोसमुळे ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू! ठाण्यातील घटना, नक्की काय घडलं?

Webdunia
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2023 (21:14 IST)
ठाण्यातुन  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. औषधांच्या ओव्हर डोसमुळे ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन नको म्हणून आपल्या ८ महिन्याच्या बाळाचा मृतदेह घेऊन वडिलांनी पोबारा केला आहे. या घटनेनंतर रुग्णालयात एकाच खळबळ उडाली होती. तर या प्रकारची माहिती तात्काळ रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी मुलाच्या वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ही धक्कादायक घटना गुरूवारी (१४ सप्टेंबर) रोजी रात्री १०:३० च्या सुमारास घडली आहे. हि घटना ठाण्यातील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडली. ८ महिन्याच्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र आज पहाटे च्या सुमारास उपचारा करत असताना या बाळाचा मृत्यू झाला. या बाळाला जेव्हा रुग्णालयात आणले होते त्या वेळी निमोनिया आणि खोकल्याच्या औषधाचा ओव्हर डोस दिल्याचे आढळून आले होते.
 
दरम्यान बाळाचा मृत्यू झाल्यानंतर शव विच्छेदन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर बाळाच्या वडिलांनी त्यास विरोध केला आणि वार्डमधून आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन सरळ पसार झाला. ही घटना घडल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ झाला. याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ पोलिसांना देण्यात आली आहे. तर घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शिळ डायघर येथून बापाला ताब्यात घेऊन कळवा रुग्णालयात आणले आहे.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments