Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यामध्ये तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (16:27 IST)
Thane news: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे आणि एक मित्र बेपत्ता झाला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार हे मुलं 13-15 वर्षांचे होते. हे दोघेही मुलं गुरुवारी संध्याकाळी भिवंडीतील तलावावर आंघोळीसाठी गेले होते आणि त्याचवेळी त्यांचा बुडून मृत्यू झाला. स्थानिकांकडून माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. भिवंडी टाऊन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दोन मुलांसोबत असलेल्या तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.  गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास तिन्ही मुले शाळा संपवून घरी परतली. व तिघेही फिरायला बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी तिन्ही मुले पोहण्यासाठी तलावात गेल्याची माहिती मुलाच्या भावाला मिळाली. त्यानंतर कुटुंबीयांनी शांतीनगर पोलिस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली. तसेच अग्निशमन दलाला कळवले. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी उशिरा तलावातील मुलांची शोधमोहीम सुरू करण्यात आली. यामध्ये दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. पण, अंधारामुळे तिसऱ्या मुलाचा शोध थांबवावा लागला. आज सकाळी पुन्हा तिसऱ्या मुलाचा शोध सुरू करण्यात आला.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

काँग्रेसने ठाणे जिल्ह्यातील 8 सदस्यांचे निलंबन केले

परभणी हिंसाचार आणि बीड येथील सरपंचाच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या न्यायालयीन चौकशीच्या सूचना

LIVE: शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांच्या जीवाला धोका

शिवसेना UBT खासदार संजय राऊत यांच्या जीवाला धोका! घराची रेकी केली

भोपाळच्या जंगलात एका वाहनात 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपयांची रोकड सापडली

पुढील लेख
Show comments