Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत

Webdunia
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2022 (08:15 IST)
उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहोचविण्यात आल्या आहेत, असे सांगत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिले.

राज्यातील महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करण्यासाठी विरोधी पक्ष एकवटले आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनीही पुण्यात सोमवारी राज्यपालां विरोधात नाराजी व्यक्त करत राज्यपालांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पदमुक्त करण्याचे सूचक संकेत दिले.
 
खासदार उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्ष कायम आहे. छत्रपती घराण्याचे वंशज कधीच हतबल होऊ शकत नाहीत. त्यांच्या भावना योग्य ठिकाणी पोहचल्या आहेत. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. यात सरकार काही हस्तक्षेप करू शकत नाही. राज्यपालांना पदमुक्त करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

Edited By- Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

LIVE: उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला

भाजपच्या 'एक हैं तो सेफ हैं' या घोषणेचा उद्धव ठाकरे समाचार घेत म्हणाले भारत आणि बांगलादेशात सुरक्षित नाही मंदिरे

दिल्लीमध्ये आरके पुरमच्या DPS सहित अनेक शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी

लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल

बापरे ! भंडारा जिल्ह्यात चक्क वाघासोबत लोकांनी घेतला सेल्फी

पुढील लेख
Show comments