Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सर्वात साहसी सेल्फीचा प्रयत्न की एक बेजबाबदार पाऊल? मुंबई पोलिसांचे व्हिडियोद्वारे प्रबोधन

सर्वात साहसी सेल्फीचा प्रयत्न की एक बेजबाबदार पाऊल? मुंबई पोलिसांचे व्हिडियोद्वारे प्रबोधन
, शुक्रवार, 3 मे 2019 (09:53 IST)
सेल्फी घेतांना अनेकांना जीव गमवावा लागतो, कोणतीही काळजी आणि विचार न करता मोबाईल मध्ये सेल्फी घेतांना अनेक अपघात होतात. यावर मुंबई पोलिसांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट टाकली असून तो एक व्हिडियो आहे. या द्वारे विचार न करता घेतलेला सेल्फी कसा जीव घेतो हे दाखवले आहे. Attempt for the most daring selfie? Or just another irresponsible adventure? Whatever this was for, it clearly wasn’t worth the risk अर्थात सर्वात साहसी सेल्फीचा प्रयत्न की एक बेजबाबदार पाऊल?  या मथळ्याखाली व्हिडियो पोस्ट केला आहे. एका सेल्फीसाठी स्वतःच्या जीवाशी खेळू नका असेही आवाहन केले आहे. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कोणता आहे आणि तो तरूण कोण आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र जीव वाचवा, अशी जोखीम घेऊ नका असे सांगत जनजागृतीसाठी मुंबई पोलिसांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.या व्हिडिओमध्ये एक तरूण एका उंच इमारतीच्या गच्चीवर उभा आहे. गच्चीच्या कठड्यावर उभा राहून तो सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचवेळी हा तरूण अचानक कोसळतो आणि खाली पडतो. तोल गेल्याने तो माणूस पडतो आहे हे या व्हिडिओत दिसतेच आहे. तसंच त्याचा जीव त्याला गमवावा लागला आहे हेही स्पष्ट होते आहे. एका सेल्फीच्या मोहापायी असे स्टंट करू नका असेच आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. त्यामुळे असा जीवघेणारा सेल्फी हा व्हिडियो पाहून तरी घेऊ नका असे यातून स्पष्ट होते आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

थायलंडचे राजा महिला कमांडरशी लग्न करणार