Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच

अनिल देशमुखांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (16:37 IST)
१०० कोटींच्या वसुली प्रकरणामध्ये ईडीने अटक केलेले राज्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत आहेत. दरम्यान, सीबीआय तपासाचा अहवाल तपासणीसाठी न्यायालयाच्या समोर ठेवण्याची मागणी करणारी अनिल देशमुख यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र यासंदर्भात हायकोर्टात जाण्याची परवानगी सुप्रिम कोर्टाने अनिल देशमुख यांना दिली आहे.
 
तपास यंत्रणांना त्यांनी केलेल्या चौकशीची माहिती निरीक्षणासाठी कोर्टासमोर ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी अनिल देशमुख यांनी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करून केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रिम कोर्टाने अनिल देशमुख यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावली. तसेच देशमुख यांना याबाबत संबंधित कोर्टात जाण्याची परवानगी सुप्रिम कोर्टाने दिली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हेल माशाची दोन कोटींची उलटी बाळगणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या!