Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा व्यवस्थापक जुंबाडे निलंबित

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ घोटाळा व्यवस्थापक जुंबाडे निलंबित
, शुक्रवार, 4 मे 2018 (15:16 IST)
मुंबई येथील असलेल्या दहिसर भागातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयातून महत्त्वपूर्ण फाईल्स चोरी झाल्याप्रकरणी राज्य सरकारकडून मोठी महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळा प्रकरणी महामंडळाचे व्यवस्थापक नागेश जुंबाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
 
या प्रकारची कारवाई सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली असून त्याबाबत माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. 28 तारखेला ही चोरी झाली आहे या चोरीनंतर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या ३८५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांशी संबंधित सर्व कागदपत्रे सुरक्षित असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे. सीआयडी ने यापूर्वीच या घोटाळ्यासंबंधीच्या सर्व फाईल्स कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली आहेत. या कार्यालयात अन्य फायली संगणक वगळता फार काही नव्हते, असा दावा दिलीप कांबळे यांनी केला आहे.
 
सामाजिक न्याय विभागाच्या मालकीची दहिसरमधील हनुमान टेकडी भागात कल्याणी केंद्र ही चार मजली इमारत आहे. या ठिकाणी २०१५ पर्यंत साठे महामंडळाचे कार्यालय आहे. महामंडळाचे सर्व रेकॉर्ड याच इमारतीत ठेवण्यात आले आहेत. २०१२ ते २०१५ या काळातच महामंडळात कोट्यवधींचे घोटाळे झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Flipkartला विकत घेण्यासाठी या कंपनीने बाजी मारली, लवकरच होईल डील