Marathi Biodata Maker

सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं- आदित्य ठाकरे

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (09:30 IST)
"सध्या लोकशाहीची थट्टा सुरू आहे. आमच्याकडून राजकारण कमी झालं. सर्कसमध्ये काहीही होऊ शकतं", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करुन नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली आहे. या कार्यकारिणीत एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 
तर दीपक केसरकर यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या या निर्णयानंतर शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 
 
"सर्कसमध्ये काहीही होऊ शकते. राज्यात जे सुरू आहे ते घटनाबाह्य आहे. ही लोकशाहीची थट्टा सुरू आहे. मी याकडे जास्त लक्ष देत नाहीये. आमच्याकडून राजकारण कमी झालं, हा आमचा दोष असू शकतो. चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसते. त्यामुळे हादेखील आमचा दोष असू शकतो. आम्ही लोकांची 24 तास सेवा करत आहोत. आमचं हे काम अजूही सुरू आहे," असं आदित्य म्हणाले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

"सुंदर मुलगी दिसली तर तिच्यावर बलात्कार..." काँग्रेस आमदाराच्या वादग्रस्त विधानाने गोंधळ उडाला

EPFO चे पैसे आता UPI वापरून काढता येणार

बीएमसी निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींची पोस्ट - महाराष्ट्रातील जनतेचे आभार

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

महानगरपालिका निवडणुकीत एआयएमआयएमने प्रभावी कामगिरी केली, सात जागा जिंकल्या

पुढील लेख
Show comments