Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हाडाच्या स्वस्त घरांसाठी अर्ज सुरू!, अर्ज कुठे करावे जाणून घ्या

mhada
Webdunia
बुधवार, 13 मार्च 2024 (13:52 IST)
प्रत्येकाला वाटते स्वताचे घर असावे. म्हाडाचे स्वस्त घर घेणाऱ्यांसाठी घर घेण्याची सुवर्ण संधी आहे. आता मुंबई व पुण्यात म्हाडा कडून घर घेणं सोपं झालं आहे. म्हाडाचे4 हजार 777 घरांसाठी अर्ज सुरु झाले आहे. 
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून विविध उत्पन्न गटामधील पुणे, सोलापूर, कोल्हापूर सातारा, सांगली या पाच जिल्ह्यात लॉटरी जाहीर केली आहे. यात पुण्यातील पिंपरी, चिंचवड येथील 745 आणि 561 घरांचा समावेश करण्यात आला आहे.
लॉटरीचा प्रारंभ पुणे मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून आता अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतील. 
अर्ज कसा आणि कुठे करावा -
अर्जदारांनी www.mhada.gov.in या संकेतस्थळा भेट द्यावी किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. महत्त्वाचं म्हणजे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडा पुणेचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे.
अर्जदारांनी ऑनलाईन अर्जाची नोंदणी 8 एप्रिल सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावी. तर लॉटरी साठी अर्ज ऑनलाइन अर्ज 10 एप्रिल रोजी रात्री 11.59 पर्यंत सुरू असणार आहे. अर्जाचा ऑनलाइन शुल्क भरणा 12 एप्रिलपर्यंत करता येऊ शकते. 
 
 Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

LIVE: आदित्य ठाकरेंनीही केला कुणाल कामराचा बचाव

स्टुडिओमध्ये तोडफोड करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची संजय राऊतांची मागणी

एकनाथ शिंदेंवरील कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments